प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्या उत्तराधिकाऱ्याबाबत सध्या जगभरात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाची गुप्तहेर संस्था National Intelligence Service (NIS) ने एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे.
NIS चा दावा काय?
NIS च्या गुप्त बैठकीनंतर, संस्थेचे संचालक ली जोंग-सेओक यांनी दक्षिण कोरियाच्या संसदेत माहिती देताना सांगितले की,
किम जोंग उन यांची मुलगी किम जु ए हिला भविष्यातील उत्तराधिकारी म्हणून तयार केले जात असल्याचे संकेत आहेत.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वाढलेली उपस्थिती
२०२२ पासून किम जु ए वडिलांसोबत अनेक लष्करी आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये दिसत आहे

उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी तिला सर्वात प्रिय अपत्य असे संबोधले आहे
तिने टँक चालवण्यासारख्या लष्करी उपक्रमांमध्ये सहभाग घेतला,शस्त्रास्त्र कारखान्यांना भेट देताना तिला विशेष स्थान दिले गेले
या सर्व गोष्टी तिची भविष्यातील नेता म्हणून प्रतिमा तयार करण्याचा भाग असल्याचे मानले जात आहे.
तज्ज्ञांचे मत काय ?
उत्तर कोरिया ही पुरुषप्रधान व्यवस्था असल्याने महिला सत्ताधारी होणे आव्हानात्मक ठरू शकते
किम जोंग उन सध्या फक्त ४२ वर्षांचे आहेत, त्यामुळे इतक्या लवकर उत्तराधिकारी जाहीर करणे धोकादायक ठरू शकते
काही विश्लेषकांच्या मते, हा फक्त इमेज बिल्डिंग चा भाग असू शकतो
किम कुटुंबाची परंपरा
उत्तर कोरियावर १९४८ पासून किम कुटुंबाचे राज्य आहे:
किम इल सुंग (संस्थापक)
किम जोंग इल (पुत्र)
किम जोंग उन (नातू)
जर किम जु ए सत्तेवर आली, तर ती चौथ्या पिढीची शासक ठरेल,उत्तर कोरियाची पहिली महिला नेता बनेल.






