Google search engine

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक

 

कोल्हापूर: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा व प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांचे 30 एप्रिल 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ताराबाई पार्क येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात शोकसभा घेण्यात आली. प्रारंभी दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांनी 2008 पासून सचिव म्हणून ग्रामीण भागात आधुनिक शिक्षण पोहोचवण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे नमूद केले. संस्थेच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावून नावलौकिक वाढविला, असे वक्त्यांनी सांगितले.
या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here