राजेश्वरी खरात कडून लवकरच गुडन्यूज…

0
132
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फ्रँड्री चित्रपटातील ‘शालू’ या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या राजेश्वरीने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवणारे वक्तव्य केले आहे.

यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तिने तिच्या आणि ‘फ्रँड्री’मधील सहकलाकार सोमनाथ अवघडे (जब्या) यांच्याविषयीही भाष्य केलं. “जब्या आणि माझे व्हायरल होत असलेल्या फोटोंचं प्रकरण मी अजून थोडंसं गुपितच ठेवते. कारण आमचं लग्न झालंय की नाही हे लोकांना ठरवू द्या. मी पुढच्या काही दिवसांत सर्वांना गुडन्यूज देणार आहे. पण सध्यातरी हे गुपित ठेवायचं आहे. पण सांगायचं झालं तर सोमनाथ सोबत माझं बरंचसं शूटिंग झालं आहे. लवकरच खूप सारे प्रोजेक्ट्स, स्टोरीज आणि स्क्रिप्ट तुमच्यासमोर येणार आहे,” असं राजेश्वरी खरातने स्पष्ट केलं.

या विधानानंतर चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी राजेश्वरी आणि सोमनाथ यांचा नवा चित्रपट, वेब सिरीज किंवा अन्य प्रोजेक्ट लवकरच येणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असून तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. ती वेळोवेळी तिच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे पुढील काही दिवसांत ती नेमकी कोणती गुडन्यूज देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

——————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here