Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

वॉशिंग्टन:डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र लवकरच काही अमेरिकन पासपोर्टवर दिसणार असल्याची अधिकृत पुष्टी मंगळवारी करण्यात आली. अमेरिकेच्या स्वातंत्र्य घोषणेच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त हा विशेष मर्यादित आवृत्तीचा पासपोर्ट जारी केला जाणार आहे.

अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंट ने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष पासपोर्टमध्ये ट्रम्प यांचे छायाचित्र स्वातंत्र्य घोषणेच्या पार्श्वभूमीवर दाखवण्यात येणार असून त्याखाली त्यांची स्वाक्षरीही असेल. तसेच अमेरिकेच्या संस्थापक नेत्यांची छायाचित्रेही यात समाविष्ट असतील.

प्रवक्ते टॉमी पिगॉट (Tommy Pigott)यांनी सांगितले की, “अमेरिकेच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त हा विशेष पासपोर्ट मर्यादित संख्येत जारी केला जाणार आहे.” या पासपोर्टसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

जगभरात लोकशाही देशांमध्ये सत्ताधारी नेत्यांचे छायाचित्र पासपोर्टवर देण्याची प्रथा क्वचितच आढळते. सध्या अमेरिकन पासपोर्टवर Apollo 11 Moon Landing  तसेच Statue of Liberty यांसारख्या ऐतिहासिक घटना व स्थळांची चित्रे असतात.

दरम्यान, सत्तेत पुनरागमन केल्यानंतर ट्रम्प यांनी विविध सरकारी संस्थांमध्ये स्वतःची छाप अधिक ठळकपणे उमटवण्यास सुरुवात केली आहे. काही सरकारी इमारतींवर त्यांचे बॅनर लावण्यात आले असून त्यांनी केनेडी सेंटर सारख्या संस्थांवरही आपले नाव लावले आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकन अर्थ विभागाने डॉलरवरही ट्रम्प यांच्या स्वाक्षरीचा समावेश होणार असल्याची घोषणा केली होती.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here