प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी उसळी दिसून आली असून, हॉर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार आणि व्यापारी सावध झाले आहेत.
अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांना इराणच्या बंदरांवर आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीवर दीर्घकालीन नाकेबंदीची तयारी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे.
दुपारी सुमारे १:३५ GMT(ग्रीनविच मीन टाइम) वाजता, जून डिलिव्हरीसाठी Brent crude प्रति बॅरल ५.१६ टक्क्यांनी वाढून ११७ डॉलर्सवर पोहोचले. ही पातळी युनायटेड स्टेट आणि इराण यांच्यातील नाजूक युद्धविरामानंतरची सर्वोच्च आहे.
त्याचवेळी, अमेरिकेचा बेंचमार्क West Texas Intermediate (WTI) जून डिलिव्हरीसाठी ४.८५ टक्क्यांनी वाढून १०४.७८ डॉलर्सवर पोहोचला आहे.
हॉर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असून, येथे कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा परिणाम होतो.






