डिसेंबरअखेर DPCची सर्व मंजूर विकासकामे पूर्ण करा; आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

0
29
Google search engine

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीमार्फत (DPC) मंजूर झालेल्या महापालिकेच्या विविध विकासकामांचा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कामाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून डिसेंबर २०२६ अखेर सर्व मंजूर कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे कडक निर्देश त्यांनी दिले.

विकासकामांचा दर आठवड्याला आढावा घेऊन कामांना गती द्यावी तसेच दर पंधरवड्याला कामांच्या प्रगतीची तपासणी केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ सल्लागार कंपनी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

शहरातील कारंजे नियमित सुरू ठेवण्यासाठी आठवड्यातील दिवस निश्चित करून त्याची माहिती नागरिकांना जाहीर करावी. तसेच मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी शहरातील क्लासेसची दैनंदिन तपासणी करून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.

महापालिकेच्या सर्व विभागांनी विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करून रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही आयुक्तांनी सांगितले.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, मिलिंद जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, शाखा अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, अवधूत नेर्लेकर यांच्यासह संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here