Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

ध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे, त्यामुळे जगभरात इंधनाच्या किमतीत चढ-उतार दिसत आहेत. भारतातही LPG सिलिंडरच्या दरांवर त्याचा परिणाम होत असून अनेक ठिकाणी सिलिंडरचे दर 900 रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोक गॅसला पर्याय शोधू लागले आहेत.

आता फक्त पाच हजार रुपयांच्या बजेटमध्ये छोटंसं गॅस-फ्री किचन तयार करणं शक्य आहे. काही इलेक्ट्रिक किचन गॅजेट्सच्या मदतीने गॅसशिवायही रोजचा स्वयंपाक सहज करता येऊ शकतो.

 गॅसशिवाय स्वयंपाक कसा करायचा?

भारतात बहुतांश घरांमध्ये स्वयंपाक LPG गॅसवर केला जातो. एका कुटुंबाला महिन्याला साधारण एक सिलिंडर लागतो. म्हणजेच वर्षभरात केवळ स्वयंपाकासाठी सुमारे 10 ते 11 हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. त्यामुळे गॅसवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक उपकरणांचा पर्याय निवडत आहेत.

पाच हजारांत तयार होईल गॅस-फ्री किचन

फक्त तीन इलेक्ट्रिक उपकरणे घेतल्यास तुम्ही छोटं गॅस-फ्री किचन तयार करू शकता.

इंडक्शन कुकटॉप – सुमारे 1500 ते 2000 रुपये

वीजेच्या मदतीने भांडे थेट गरम होते

उष्णतेचा अपव्यय कमी होतो

स्वयंपाक लवकर होतो.

इलेक्ट्रिक राइस कुकर / मल्टी कुकर – सुमारे 1200 ते 1800 रुपये

भात, डाळ, खिचडी, भाज्या सहज बनवता येतात

छोट्या कुटुंबांसाठी खूप उपयोगी

इलेक्ट्रिक केटली – सुमारे 500 ते 800 रुपये

पाणी उकळणे, चहा बनवणे, इंस्टंट पदार्थ तयार करणे सोप

या तीन उपकरणांवर एकूण खर्च सुमारे 3500 ते 5000 रुपये येतो. एकदाच छोटा खर्च करून गॅस सिलिंडरवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी करता येते.

 विजेचे बिल किती येईल?

अनेकांना प्रश्न पडतो की वीजेवर स्वयंपाक केल्यास बिल किती वाढेल. भारतात घरगुती वीज दर साधारणपणे 4 ते 8 रुपये प्रति युनिट असतो.

जर 2000 वॅटचा इंडक्शन कुकटॉप रोज दोन तास वापरला, तर महिन्याला सुमारे 100 ते 120 युनिट वीज खर्च होऊ शकते. त्यामुळे विजेचे बिल साधारण 600 ते 900 रुपये येऊ शकते.

म्हणजेच एका LPG सिलिंडरच्या किंमतीइतकाच खर्च येतो, पण गॅस संपण्याची किंवा सिलिंडर मिळण्याची चिंता राहत नाही.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here