आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; आजरा-चंदगड दुष्काळग्रस्त

0
53
Google search engine

चंदगड : पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झालेल्या आजरा व चंदगड तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश करण्यात आला आहे. यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांना जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमीच्या कामांमध्ये शिथिलता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था अशा १२ सवलतींचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, गडहिंग्लज तालुक्याचाही दुष्काळग्रस्त भागात समावेश व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाकडेही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here