गोकुळ निवडणुकीसाठी अभिजीत तायशेटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
64
Google search engine

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या वतीने अभिजीत तायशेटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समर्थक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.शेतकरी, दूध उत्पादक आणि सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत गोकुळच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार तायशेटे यांनी व्यक्त केला.

दूध उत्पादकांच्या भविष्यासाठी तसेच संघाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.“शेतकऱ्यांचा विश्वास, सभासदांची साथ आणि विकासाची नवी दिशा” या भूमिकेसह निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचे अभिजीत तायशेटे यांनी स्पष्ट केले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here