गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; रंकाळा अतिक्रमण हटविण्याचे आयुक्तांचे निर्देश…

0
30
Google search engine

कोल्हापूर:कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, करवसुली, अतिक्रमण निर्मूलन आणि गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.रंकाळा परिसरातील अतिक्रमणे व हातगाड्यांवर गुरुवार-शुक्रवारी संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

गणेशोत्सवाच्या आगमन-विसर्जन मार्गावरील पॅचवर्क, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, कन्व्हर्ट बेल्ट दुरुस्ती आणि विसर्जन कुंडांचे नियोजन तातडीने करण्यास सांगण्यात आले.महापालिका शाळांची अचानक तपासणी, वर्कशॉपमधील स्क्रॅपचे २८ ऑगस्टला ई-ऑक्शन, थकीत गाळे हटविणे, कोचिंग क्लासेससाठी परवाना कॅम्प, नवीन बांधकामांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणे तसेच पर्यटकांसाठी पार्किंग दिशादर्शक फलक लावण्याचेही निर्देश देण्यात आले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here