कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सर्किट बेंचच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना मुंबईपर्यंत जाण्याची वेळ न येता स्थानिक पातळीवर न्याय मिळत आहे.सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानण्यात आले. अवघ्या एका वर्षात १४ हजारांहून अधिक प्रकरणे दाखल झाली असून, १२ हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये न्यायदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.
यावेळी सर्किट बेंचसाठी ७५ एकर जागेचा सातबारा सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यामुळे कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील न्यायव्यवस्था अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाला न्यायमूर्ती, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, वकील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






