केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पहिल्याच कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव…

0
30
Google search engine

कोल्हापूर : नूतनीकरण झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात पहिला कार्यक्रम म्हणून महापालिकेच्या स्वच्छता व वर्कशॉप विभागातील कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या २९ स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ‘नमस्ते योजने’अंतर्गत सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले, तर लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार तीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. गेल्या चार महिन्यांत सुमारे ६७ कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जुनी वाहने व स्क्रॅपमधील ट्रक अतिक्रमण कारवाईसाठी तयार करणाऱ्या तसेच जुना जेसीबी दुरुस्त करून कार्यान्वित करणाऱ्या १२ कर्मचारी व सुपरवायझरांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, विमा संरक्षण आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here