Google search engine

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक 

कोल्हापूर : डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक कोल्हापूर येथे डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनमान्य सुविधा केंद्र (Facilitation Center) सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेतील सर्व सुविधा एकाच ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या सुविधा केंद्रामध्ये ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांचे स्कॅनिंग, कागदपत्रांची पडताळणी, कागदपत्रे अपलोड करणे तसेच अर्ज निश्चिती आदी सर्व प्रक्रिया करण्यात येत आहेत. याशिवाय डिप्लोमा शिक्षणानंतरच्या व्यवसाय व नोकरीच्या संधी, कॅप राउंडची माहिती आणि प्रवेश प्रक्रियेबाबत तज्ज्ञ प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत आयोजित डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी 20 मे ते 22 जून या कालावधीत अर्ज निश्चितीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे, विविध शिष्यवृत्ती योजना आणि शासकीय सुविधांची सविस्तर माहिती सुविधा केंद्रातून दिली जात असल्याची माहिती व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी दिली. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रविवारसह सर्व दिवस सुविधा केंद्र सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभ्यासक्रमांचे माहिती फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच सर्व इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here