कोल्हापूरच्या सार्जंट शौर्या अश्वीन शिंदेला बेस्ट कॅडेट अवॉर्ड !

0
10
Google search engine

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक 

कोल्हापूर: उचगाव येथील शौर्या अश्वीन शिंदेला बेस्ट कॅडेट अवॉर्डने नुकतेच गौरवण्यात आले. ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेणारी शौर्या कोल्हापूर ग्रुपच्या 06 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनची एनसीसी कॅडेट आहे.
इयत्ता आठवी आणि नववीमध्ये शालेय शिक्षण घेत असताना NCC मधील 2 वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत, बरेच कॅम्प करत, परेड कमांडर बनत, मानाची सार्जंट ही रँकसुद्धा मिळवली सोबतच “A” सर्टिफिकेट परीक्षा चांगल्या गुणांनी पास होऊन NCC मधील सर्वात मोठा बहुमान म्हणजेच 2025 चा बेस्ट कॅडेट अवॉर्ड पटकावला.
विशेष म्हणजे हा 2025 चा बेस्ट कॅडेट स्कॉरलशीप अवॉर्ड, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांतील 200 शाळांच्या ज्युनियर विंगच्या जवळपास दहा हजार कॅडेट्समध्ये लेखी परीक्षा, स्पर्धा, स्किल टेस्ट आणि मुलाखत अशा आव्हानांचा मुकाबला करून सार्जंट शौर्याची निवड झाल्याने तिचे कौतुक होत आहे.
मंगळवारी 19 मे 2026 रोजी एनसीसी भवन कोल्हापूर येथे भव्य आणि दिमाखदार पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. कर्नल विक्रम नलवडे याच्या हस्ते सार्जंट शौर्या अश्विन शिंदे यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी कर्नल मानस दीक्षित, ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, सुभेदार मेजर नारायण पाटील, कॅप्टन श्रीदेवी पवार उपस्थित होते. सार्जंट शौर्याला ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई, कॅप्टन वर्षा मस्के यांच्याकडून विशेष ट्रेनिंग मिळाले आहे. मुख्याध्यापिका चौधरी, उपमुख्याध्यापिका जमेनीस, सौ. साठे यांचे मार्गदर्शन मिळाले.
शौर्याने वयाच्या 7 व्या वर्षी पहिलीला असताना सायकलिंग या प्रकारात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. हुबळी ते कोल्हापूर 230 किलोमीटरचे अंतर तिने सायकलवरून नॉन-स्टॉप 12 तासांत पूर्ण केले. 13 व्या वर्षी आठवीला असतानाच नेमबाजीमध्ये राष्ट्रीय टीममध्ये सहभागी झाली असून पोहणे, कब्बडी, फुटबॉल, गोळाफेक, थाळीफेक अशा इतर खेळांतही तिने यश संपादन केले आहे. भविष्यात शौर्याने एनडीएमध्ये प्रवेश मिळवून, इंडियन आर्मीमधील अधिकारी बनून देशाची सेवा करणेचे ठरवले आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here