डीकेटीईला १०.२१ कोटींचा एनटीटीएम प्रकल्प मंजूर; इचलकरंजी टेक्निकल टेक्सटाईल हबकडे वाटचाल

भारत सरकारकडून डीकेटीईला मोठा दिलासा; टेक्निकल टेक्सटाईल शिक्षणाला चालना;इचलकरंजीच्या औद्योगिक विकासाला बूस्ट; डीकेटीईला केंद्र सरकारचा कोटींचा प्रकल्प

0
18
Google search engine

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक

इचलकरंजी (प्रतिनिधी): येथील डीकेटीई टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशन (एनटीटीएम) अंतर्गत १०.२१ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून टेक्निकल टेक्स्टाईल क्षेत्रातील शैक्षणिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.

डीकेटीईमध्ये आधीपासून उपलब्ध असलेली अत्याधुनिक यंत्रसामुग्री, संशोधनाची परंपरा आणि या नव्या प्रकल्पामुळे टेक्निकल टेक्स्टाईल क्षेत्रातील उद्योगवाढीस मोठी चालना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.

एनटीटीएम हे भारत सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून, देशातील टेक्निकल टेक्स्टाईल उद्योगाचा विकास, कुशल मनुष्यबळ निर्मिती आणि स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देणे यावर भर दिला जात आहे. या योजनेअंतर्गत डीकेटीईचे विविध निकषांवर मूल्यांकन करण्यात आले होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव प्रा. डॉ. सपना आवाडे आणि कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने औद्योगिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

दरम्यान, या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक डॉ. यू. जे. पाटील, डीन प्रा. डॉ. एस. बी. व्हनबट्टे तसेच टेक्स्टाईल विभागातील प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रकल्पामुळे इचलकरंजीला टेक्निकल टेक्स्टाईल हब म्हणून विकसित होण्यास गती मिळणार आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here