प्रसारमाध्यम l प्रतिनिधी
भगवान महावीर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून “जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन” (जीतो) च्या वतीने जगभरामध्ये विविध देशात 130 ठिकाणी व भारतामध्ये 8000 ठिकाणी नवकार महामंत्र पठण कार्यक्रम आयोजित केला आहे. संपूर्ण जगामध्ये युद्ध संघर्ष, आतंकवाद, दुराचार, हिंसाचार वाढत असताना संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापीत व्हावी व सुख-शांती आनंद पसरावा या उद्देशाने “जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन- जितो अपेक्स” या अग्रणी संस्थेचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज कोठारी यांनी हा संकल्प केला आहे.
या कार्यक्रमांमध्ये तीन कोटी हून अधिक लोक सहभागी होतील असा संकल्प जीतो संघटनेच्या वतीने केला आहे. मागील वर्षी या कार्यक्रमाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग नोंदवला होता. त्या वेळी एक कोटी आठ लाख लोकांनी एकाच वेळी महामंत्र पठण करून विश्व विक्रम करून वैश्विक ऊर्जेचा संदेश दिला होता. आणि ९ एप्रिल हा विश्व नवकार महामंत्र दिवस जाहीर केला आहे.
जैन धर्मातील नवकार महामंत्र हा शक्तीशाली मंत्र मानला जातो. या मंत्रामध्ये विश्वातील सर्व अरिहंत साधू उपाध्याय यांना नमन केले जाते. या मंत्राने आत्मकल्याण होऊन मोक्षमार्गाची दिशा मिळते. या मंत्राद्वारे सामूहिक मंत्र पठण केल्याने एक वैश्विक ऊर्जा निर्माण होऊन जगभरामध्ये सुख-शांती नांदेल या भावनेने संपूर्ण जगात १ एप्रिल रोजी एकाच वेळी सकाळी 7:30 ते 9 या वेळेमध्ये नवकार महामंत्र पठण होणार आहे.
जीतो कोल्हापूर आणि इचलकरंजी चॅप्टरच्या वतीने हा कार्यक्रम भव्य प्रमाणात आयोजित केला जाणार असून कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील आणि इचलकरंजी जवळील कर्नाटक भागातील सर्व जैन श्रावक है एकत्रीतपणे जैन मंदिर आणि तीर्थक्षेत्र व विविध ठिकाणी एकत्रित नमोकार महामंत्र पठण करतील. भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह, दिल्ली मधून करणार आहेत. 9 एप्रिल रोजी सकाळी ठीक 7:30 वाजता करणार आहेत. या कार्यक्रमाचे ऑनलाइन व्हिडिओ दिसणार आहे. सदर कार्यक्रमांमध्ये जैन समाजाबरोबर इतर समाजही सामील होणार आहेत. कोल्हापूर चॅप्टर वतीने मागील वर्षी प्रत्येक जैन मंदिरात सामुहिक नवकार महामंत्र कार्यक्रम आयोजित केले होते. कोल्हापूर जिल्हयात वीस हजार हुन अधिक लोक सहभागी झाले होते.
या वर्षी कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने शहर आणि ग्रामीण आगालील सर्व दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी या सर्व पंथीय जैन मंदिर मध्ये नवकार महामंत्र पठण केले जाणार आहे. कोल्हापूर व जवळच्या ग्रामीण भागातील जैन बांधवासाठी “महासैनिक दरबार हॉल”, सर्किट हाउस रोड, बावडा येथे आयोजन केले असून त्याचे मुख्य प्रायोजक “संजय घोडावत ग्रुप” आहे. यासाठी जीतो कोल्हापूर चेअरमन रवी संघवी, मानद सचिव अनिल पाटील, कन्व्हेनर जितेंद्र राठोड, राजीव परीख, गिरीश शहा, रवींद्र देवमोरे, युथ विंग चेअरमन प्रतिक ओसवाल, लेडीज विंग माया राठोड व सर्व चेअरपर्सन सभासद, पदाधिकारी मोठ्या जोमाने नियोजन करीत आहेत. भगवान महावीरांनी दिलेला विश्वशांती, अहिंसा संदेश जगाला देण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्यासाठी
https://navkardivas.jitoworld.org
या लिंक वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात सर्व धर्मातील लोक उपस्थित राहणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त जैन व अजैन लोक मोठ्या संख्येने नोंद करून विश्व विक्रममध्ये सहभागी होण्याचे आह्वान जितो तर्फे केले आहे.





