प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीबाबत सरकारचा नवा निर्णय !

0
142
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ही शेतकर्‍यांच्या आर्थीक मदतीसाठीची योजना आहे ज्याच्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात पाठवली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.

तुम्हीही प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते! कारण योजनेचा पुढचा हप्ता वेळेवर मिळणार की थांबणार, हे आता एका नव्या कागदपत्रावर अवलंबून असणार आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, ‘शेतकरी ओळखपत्र’ नसल्यास योजनेचा पुढील हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार नाही, अशी स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत १९ हप्त्यांचे पैसे मिळाले असले तरी २०वा हप्ता मिळवण्यासाठी हे ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here