सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करावे

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थाना राज्य शासनाच्या सूचना

0
110
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

यंदाच्या गणेशोत्सवात जल प्रदूषण होऊ नये यासाठी सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करावे लागणार आहे. या मूर्तींचे विसर्जन व्यवस्थित व्हावे यासाठी कृत्रिम तलाव तुलनेने जास्त खोलीचे व पुरेश्या रुंदीचे असावेत अशा सूचना राज्य शासन प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना परिपत्रकाद्वारे केली आहे.

न्यायालयाने पीओपी च्या गणेश मूर्ती वरील बंदी उठवली आहे. मात्र सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावेत असे आदेश दिले होते. यास अनुसरून राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना सूचना केल्या आहेत. आतापर्यंत सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांत – नद्यांमध्ये अथवा तलावांमध्ये – करण्याची मुभा होती, विशेषतः ज्या मूर्ती मातीच्या किंवा पर्यावरणपूरक साहित्याच्या बनवलेल्या असत. मात्र यंदा पर्यावरण रक्षण आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.

पीओपी मूर्तींचा विघटनकाल खूप मोठा असतो. त्यामुळे त्यांचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन झाल्यास जलप्रदूषणाची तीव्र समस्या निर्माण होते. हे लक्षात घेता सर्व पीओपी मूर्ती (त्या सहा फुटांखाली असाव्यात)  मोठ्या असणाऱ्या फक्त कृत्रिम तलावातच विसर्जित करणे योग्य आहे, असे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.

——————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here