कोणत्या जागेत कोणते रोप लावावे….

0
240
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

वृक्ष लागवड करण्यापुर्वी / करतानाखालील बाबींचा / पर्यायांचा विचार जरूर करावा…वृक्षाची ज्या ठिकाणी लागवड करणार आहात त्या जागेबाबत …

जागा वीजवाहिन्यांच्या / टेलिफोन वाहिन्यांच्या खाली आहे का? असल्यास कमी उंचीचे वृक्ष लावावेत
जागा पाण्याच्या / ड्रेनेजच्या पाईप लाईनजवळ आहे का? गटारीजवळ आहे का? -असल्यास लहान आकाराचे वृक्ष लावावेत.

जागा कंपाउंड भिंतीला लागून आहे का? जागा पाणी जास्त साठविणारी, दलदलीत आहे का? जागा खारवट आहे का? असल्यास जागेच्या वरील प्रकाराप्रमाणे त्यास योग्य असणाऱ्या वृक्षांचीच लागवड करावेत

जागा कोरड्या, उष्ण हवामान असणाऱ्या तसेच अगदी कमी पाणी उपलब्ध असणाऱ्या प्रदेशातील आहे का? असल्यास उष्ण हवामानात व कमी पाण्यावर -वाढणाऱ्या वृक्षांचीच लागवड करावी.

निवड केलेल्या जागेत किती झाडे लावायची आहेत? एका पेक्षा जास्त झाडे लावायची असल्यास दोन झाडांतील अंतराचा विचार करावा.

मोठे वृक्षः १५ ते २० फूट अंतर
मध्यम वृक्षः १० ते १५ फूट अंतर
लहान वृक्षः ०७ ते १० फूट अंतर

साभार : झाड लावताना … वृक्षारोपणासाठी मार्गदर्शक पुस्तिका

लेखक : डॉ. मधुकर बाचूळकर व डॉ. मकरंद ऐतवडे

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here