शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल जाहीर

0
152
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल पाहण्यासाठी बातमीत लिंक देण्यात आली आहे.
हा निकाल www.mscepune.in व https://puppssmsce.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्याथ्यर्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २५/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
सर्व शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल या लिंकवरून पाहा – https://2025.puppssmsce.in/#
विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. ०४/०५/२०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. ०४/०५/२०२५ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here