प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक
कोल्हापूर : पंचगंगा नदी परिसरातील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता व विरंगुळा उद्यानाला आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट देत कामांचा आढावा घेतला. या उद्यानासाठी पर्यटन विभागाकडून सुमारे ४ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर असून, येथे वॉकिंग ट्रॅक व सुमारे ४५० आयुर्वेदीक झाडांची लागवड करण्यात आली आहे.
यावेळी त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दर्जेदार व टिकाऊ काम करण्याच्या सूचना देत, पावसाळ्यात पूरपाण्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच वॉकिंग ट्रॅक दुरुस्ती, लाईट व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा, वृक्षलागवड व नागरिकांसाठी मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंचगंगा परिसर पर्यटन व पर्यावरणदृष्ट्या अधिक समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





