वाघांचे अधिवास असलेले वन समृध्द वन म्हणून ओळखले जाते. जंगलात वाघांचे इतके महत्त्व असते. वाघ परिसंस्थेचे (ecosystem) आरोग्य राखण्यासाठी आणि अन्नसाखळीत (food chain) महत्त्वाचा घटक म्हणून काम करतात. वाघ शीर्ष शिकारी (top predator) असल्याने, ते विशेषत: तृनहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात आणि अप्रत्यक्षरीत्या जंगलातील वनस्पतींचे संतुलन राखण्यास मदत करतात. वाघ आपल्या देशाची नैसर्गिक ओळख आहे आणि त्यांचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. वाघांचे संरक्षण करणे म्हणजे फक्त वाघांचे संरक्षण करणे नाही, तर जंगलाचे आणि परिसंस्थेचे संरक्षण करणे होय. आज २९ जुलै अंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. यानिमित्त आपल्या राष्ट्रीय प्राण्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया…
वाघ परिसंस्थेचे संतुलन कसे ठेवतात : वाघाचे खाद्य तृनहारी प्राणी आहे. यामुळे तृनहारी प्राण्याची संख्या मर्यादित राहते. या प्राण्याचा उपद्रव वनस्पती व मानवाला होत नाही. वाघ अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहेत. ते शिकार करून इतर प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे परिसंस्थेतील इतर प्रजातींनाही फायदा होतो. वाघांच्या संरक्षणाने जंगलातील इतर प्रजाती आणि वनस्पतींचे संरक्षण होते, ज्यामुळे जंगल निरोगी राहते. वाघ पर्यटनासाठी एक महत्त्वाचे आकर्षण आहेत, ज्यामुळे स्थानिक समुदायाला आर्थिक लाभ मिळतो.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन : रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे २०१० मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र शिखर बैठक झाली. (Tiger Summit) व्याघ्र दिनाची सुरुवात झाली. या शिखर बैठकीत २९ जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. वाघांच्या संख्येत घट होण्यामागची कारणे आणि त्यांच्यासमोर असलेल्या धोक्यांबद्दल (नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, शिकार, इत्यादी) जागरूकता निर्माण करणे. वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे आणि त्यांचे संवर्धन करणे. वाघांच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे आणि लोकांना या कार्यासाठी प्रोत्साहन देणे. वाघांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांना पाठिंबा देणे. हा व्याघ्र दिनाचा उद्देश आहे.
भारतातील व्याघ्र संवर्धन: भारत हा वाघांची संख्या सर्वाधिक असलेला देश आहे. भारतात अनेक व्याघ्र प्रकल्प (Tiger Reserves) आणि अभयारण्ये (Sanctuaries) आहेत, जिथे वाघांचे संवर्धन केले जाते. ‘प्रोजेक्ट टायगर’ (Project Tiger) ही केंद्र सरकारची एक योजना आहे, जी वाघांच्या संवर्धनासाठी काम करते. भारताने TX2 उद्दिष्टाकडे लक्षणीय प्रगती केली आहे,
जगात वाघ : भारत, रशिया,चीन,नेपाळ, भूतान, बांगलादेश, कम्बोडिया, इंडोनेशिया,लाओस, मलेशिया, थायलंड आणि व्हियतनाम या देशामध्ये आढळतात. भारतामध्ये वाघांची संख्या जास्त आहे, विशेषतः मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात.
भारतातील प्रमुख व्याघ्र अभयारण्ये :
जिम कोर्बेट राष्ट्रीय उद्यान -उत्तराखंड : हे भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे आणि येथे वाघांची संख्या खूप जास्त आहे.
रणथाभोर राष्ट्रीय उद्यान- राजस्थान : हे उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
बंधीपूर राष्ट्रीय उद्यान – कर्नाटक : या उद्यानात वाघांची चांगली संख्या आहे आणि तेथे वन्यजीव पर्यटनासाठी उत्तम संधी आहेत.
कान्हा राष्ट्रीय उद्यान -मध्य प्रदेश : हे उद्यान वाघांच्या संरक्षणासाठी महत्वाचे आहे आणि येथे अनेक वाघ आहेत.
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान -पश्चिम बंगाल: हे उद्यान जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे आणि येथे रॉयल बंगाल वाघ आढळतात.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प -महाराष्ट्र : महाराष्ट्रातील हे एक महत्वाचे व्याघ्र प्रकल्प आहे.
नागार्जुनसागर-श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेश/तेलंगणा: हा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान -महाराष्ट्र : ताडोबा राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी एक महत्वाचे ठिकाण आहे.
प्रोजेक्ट टायगर : भारता सरकारने १९७३ मध्ये वाघांच्या संरक्षणासाठी ‘प्रोजेक्ट टायगर’ नावाची योजना सुरू केली.
राष्ट्रीय व्याघ्र सवर्धन प्राधिकरण : व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन राष्ट्रीय व्याघ्र सवर्धन प्राधिकरणकडून केले जाते.
भारतात दर चार वर्षांनी वाघांची संख्या मोजली जाते. सन २०२२-२३ साली वाघांची संख्या ३१६७ होती. एप्रिल २०२३ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात जगातील ७५ टक्के वाघ भारतात आहेत याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान म्हणाले की, भारतातील व्याघ्र प्रकल्प ७५,००० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापतात आणि गेल्या दहा ते बारा वर्षांत देशातील वाघांच्या संख्येत ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.






