Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

जगातील आघाडीची अवकाश तंत्रज्ञान कंपनी SpaceX आपल्या बहुचर्चित IPO (Initial Public Offering) संदर्भात महत्त्वाची पावले उचलत आहे. कंपनीने आपल्या बँकर्ससोबत झालेल्या बैठकीत IPO चे तपशील मांडले असून, यामध्ये किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांना इतिहासातील सर्वाधिक वाटा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी ब्रेट जॉन्सन यांनी सांगितले की, “Retail गुंतवणूकदार हा या IPO चा अत्यंत महत्त्वाचा भाग असेल आणि आतापर्यंतच्या कोणत्याही IPO पेक्षा अधिक असेल.” त्यांनी हेही स्पष्ट केले की, एलॉन मस्क आणि कंपनीला दीर्घकाळ पाठिंबा देणाऱ्या गुंतवणूकदारांना यामधून सन्मान देण्याचा उद्देश आहे.

हा IPO इतिहासातील सर्वात मोठा ठरू शकतो. कंपनी सुमारे ७५ अब्ज डॉलर उभारण्याचा विचार करत असून, तिचे मूल्यांकन तब्बल १.७५ ट्रिलियन डॉलरपर्यंत जाऊ शकते. IPO रोडशो ८ जूनपासून सुरू होणार असून, ११ जून रोजी १,५०० किरकोळ गुंतवणूकदारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

या ऑफरमध्ये अमेरिका व्यतिरिक्त यूके, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान आणि कोरिया येथील गुंतवणूकदारांनाही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. IPO साठीचा प्रॉस्पेक्टस मे महिन्याच्या शेवटी सार्वजनिक केला जाणार आहे.

या व्यवहाराचे नेतृत्व Morgan Stanley, Bank of America, Citigroup, JPMorgan आणि Goldman Sachs करत आहेत.

विशेष म्हणजे, SpaceX ने अलीकडेच xAI या कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीसोबत विलीनीकरण केले असून, त्यामुळे कंपनीचे एकूण मूल्यांकन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

तज्ञांच्या मते, किरकोळ गुंतवणूकदारांना मोठा वाटा देण्याचा हा निर्णय IPO बाजारात नवे ट्रेंड निर्माण करू शकतो.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here