सात-बारा आधारशी लिंक करा : चंदगड तहसिलदार

0
207
Chandgad Tahsildar Ramesh Chavhan
Google search engine

चंदगड प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज 

आपला सात-बारा दस्तऐवज आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळेल, ज्यामुळे भविष्यातील सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी ‘अॅग्रीस्टॅक योजने’ अंतर्गत आपला सात-बारा लिंक करावे, असे आवाहन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे.

ही प्रक्रिया २५ मेपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य आहे; अन्यथा शेतकऱ्यांना शासकीय लाभ मिळणार नाही. जर कोणतीही अडचण असल्यास गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

‘अॅग्रीस्टॅक योजना ही शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ओळखपत्र प्रणाली आहे, ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक खास ओळख क्रमांक (Unique Farmer ID) दिला जातो. या योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात, तसेच पीककर्ज, विमा आणि इतर सुविधा मिळवण्यास मदत होते. 
 
 
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here