सोलापूर शहरातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये कौस्तुभ गावडे यांचा संपर्क दौरा…

0
52
Google search engine

सोलापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचार मोहिमेला सोलापूर शहरात वेग आला आहे. शहरातील विविध अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांना भेटी देत प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.या संपर्क दौऱ्यात शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, संघटनात्मक उपक्रम तसेच विविध माध्यमांतून सातत्याने आवाज उठविण्याबरोबरच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न गावडे यांच्या कार्यातून झाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक विचारांचा व कार्याचा वारसा लाभलेल्या कौस्तुभ गावडे यांचे बालपणापासूनच शिक्षण क्षेत्राशी जवळचे नाते राहिले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणी, अपेक्षा आणि शिक्षण क्षेत्रासमोरील बदलती आव्हाने यांची त्यांना जाणीव असल्याचे प्रचारादरम्यान नमूद करण्यात आले.

संपर्क मोहिमेदरम्यान सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विद्याविकास प्रतिष्ठानचे इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक, ऑर्चिड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिद्धेश्वर वुमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक तसेच ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक विभागांना भेटी देण्यात आल्या.

या दौऱ्यात प्राचार्य डॉ. शंकर नवले, प्राचार्य डॉ. अनिल देशमाने, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, डॉ. विभूते, प्राचार्य डॉ. कुलकर्णी, डॉ. चव्हाण, प्राचार्य डॉ. सोनगे, प्राचार्य डॉ. तुकाराम चव्हाण, प्राचार्य डॉ. गजानन धरणे, प्राचार्य डॉ. महादेव चौगुले, प्राचार्य डॉ. विश्वजीत पोतदार यांच्यासह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक सहभागी झाले.
सोलापूर शहरातील या संपर्क मोहिमेत प्र. प्राचार्य विवेक कोरे, प्रा. सिद्धेश्वर कोणदे, प्रा. मनोज पवार तसेच गुरुदेव कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी शिक्षकांशी सातत्याने संवाद ठेवणारे नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगत कौस्तुभ गावडे यांच्या समर्थकांनी त्यांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले.

सोलापूर शहरातील विविध अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये झालेल्या या संपर्क दौऱ्यामुळे कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग आल्याचे त्यांच्या प्रचारकांकडून सांगण्यात आले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here