SSC मार्फत कनिष्ठ अभियंता भरती जाहीर

0
121
Google search engine

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या अभियंत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मॅकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल)
एकूण पदसंख्या : 1340
पगार श्रेणी : 35,400 ते 1,12,400 रुपये दरमहा
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 जुलै 2025
अधिकृत संकेतस्थळ : ssc.gov.in

अर्ज शुल्क :
  • महिला, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंगत्व असलेले उमेदवार (PwBD) आणि माजी
  • सैनिक : अर्ज शुल्क नाही
  • इतर सर्व उमेदवार : १०० रुपये शुल्क
पात्रता निकष :
  • संबंधित शाखेतील B.Tech पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे.
  • कमाल वयोमर्यादा : 30 वर्षेआरक्षणानुसार
  • अनुसूचित जाती, जमाती : 5 वर्षे सूट

  • ओबीसी : 3 वर्षे सूट

अर्ज प्रक्रिया :
  1. अधिकृत संकेतस्थळ ssc.gov.in वर जा.

  2. कनिष्ठ अभियंता भरती 2025 लिंकवर क्लिक करा.

  3. नवीन नोंदणी करा.

  4. लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा.

  5. आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती भरा व अपलोड करा.

  6. अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास).

  7. अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अभियंत्यांसाठी ही मोठी संधी आहे. तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा. वेळ वाया न घालवता तयारीला सुरुवात करा.

————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here