प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
India Oil Update, जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे, मध्य पूर्वेतील तणाव, इराणकडून स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवरील नियंत्रण, आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे अनेक देश अडचणीत असताना भारताने स्वदेशी उत्पादन वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे, राजस्थानच्या थार वाळवंटातील बीकानेर-नागौर परिसरात Oil India Limited ने बागेवाला ऑइल फील्डमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे, जोधपूर सँडस्टोन फॉर्मेशनमधून दररोज 1202 बॅरल उत्पादन होत असून मागील वर्षी हे उत्पादन 705 बॅरल होते, म्हणजेच सुमारे 70 टक्के वाढ झाली आहे,
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एकूण 43773 मेट्रिक टन कच्च्या तेलाचे उत्पादन करण्यात आले असून मागील वर्षी हेच उत्पादन 32787 मेट्रिक टन होते, या उत्पादनवाढीमुळे भारताच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे, बागेवाला फील्डचा शोध 1991 मध्ये लागला असून सुमारे 200.26 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे फील्ड 2017 पासून उत्पादनासाठी वापरात आहे, सध्या या फील्डमध्ये 52 विहिरी असून त्यापैकी 33 विहिरी सक्रिय आहेत, उत्पादन वाढवण्यासाठी यावर्षी 19 विहिरींमध्ये सायक्लिक स्टीम स्टिम्युलेशन तंत्रज्ञान यशस्वीरित्या वापरण्यात आले आहे आणि 13 नवीन विहिरींचे ड्रिलिंग करण्यात आले आहे.
थार वाळवंटातील कठीण भू-वैज्ञानिक परिस्थितीमुळे येथील कच्चे तेल अत्यंत घट्ट आणि चिकट स्वरूपाचे आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीने उत्पादन करणे अवघड होते, यावर मात करण्यासाठी कंपनीने सायक्लिक स्टीम स्टिम्युलेशन, फिशबोन ड्रिलिंग, बेयरफुट कंप्लीशन, डायल्यूएंट इंजेक्शन, इलेक्ट्रिक डाउनहोल हीटर्स आणि हाय टेम्परेचर थर्मल वेलहेड्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, जमिनीतून काढलेले कच्चे तेल टँकरद्वारे गुजरातमधील मेहसाणा येथे Oil and Natural Gas Corporation प्लांटमध्ये नेले जाते, त्यानंतर पाइपलाइनद्वारे Indian Oil Corporation Limited कोयली रिफायनरीमध्ये शुद्धीकरणासाठी पाठवले जाते.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे कच्च्या तेलाचे वापरयोग्य इंधनात रूपांतर होते, वाढत्या जागतिक संकटाच्या काळात राजस्थानमधील ही कामगिरी भारतासाठी ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.






