गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिलासा; म्हैस दुधाला ₹१.५०, गाय दुधाला ₹१ दरवाढ

0
70
Google search engine

कोल्हापूर : दूध उत्पादकांना दिलासा देत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑगस्ट २०२६ पासून म्हैस दुधाच्या दरात प्रतिलिटर १ रुपया ५० पैसे, तर गाय दुधाच्या दरात १ रुपया वाढ करण्यात आली आहे.

यानुसार ६.० फॅट व ९.० एसएनएफ म्हैस दुधाचा दर ५३.५० रुपयांवरून ५५ रुपये, तर ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गाय दुधाचा दर ३६ रुपयांवरून ३७ रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याला सुमारे ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त दर मिळणार आहे.

दरम्यान, गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरातही प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, ती १० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. गाय दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत दुग्ध व्यवसायाला बळकटी देण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे यांनी सांगितले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here