पॉलिटेक्निक प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

0
298
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. आता पसंतीक्रम भरण्यासाठी ८ ते १० जुलैची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठीची गुणवत्ता यादी १२ जुलैला जाहीर होईल. या फेरीचे प्रवेश १३ ते १५ जुलै या कालावधीत होतील. त्यानंतर १६ जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर होणार असून १७ ते १९ जुलै या कालावधीत दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरण्याची मुदत असेल. ही दुसऱ्या फेरीसाठीची यादी २१ जुलैला जाहीर होऊन २२ ते २४ जुलैदरम्यान प्रवेश प्रक्रिया होतील. या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्यांपैकी ४१९ अर्ज बनावट होते. त्यामुळे महाराष्ट्रातून दाखल झालेले एक लाख ४० हजार,२८६ आणि महाराष्ट्राबाहेरून आलेले ५६४ असे एकूण एक लाख ४० हजार,८५० विद्यार्थ्यांचे अर्ज या यादीत समाविष्ट झाले आहेत. आता ८ ते १० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे पसंतीक्रम भरायचे आहेत

दहावीनंतर पॉलिटेक्निकचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढली असून विशेष म्हणजे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचा पर्याय खुणावत आहे. यंदाही दहावीत १०० टक्के मिळवलेल्या पाच विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकसाठी अर्ज दाखल केले आहेत. तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ९ हजार,६८६ विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादीत आहेत. विशेष म्हणजे यातील ५ हजार,९६२ मुली आहेत.

आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर ८ ते १० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे पसंतीक्रम भरायचे आहेत. ‘यंदा नव्या नियमांनुसार प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) चार फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीसाठी पहिल्या पसंतीचे, दुसऱ्या फेरीसाठी पहिल्या तीन क्रमांकाच्या पसंतीचे आणि तिसऱ्या फेरीसाठी पहिल्या सहा क्रमांकांच्या पसंतीच्या महाविद्यालयांपैकी एकाही महाविद्यालयात विद्यार्थ्याचे नाव आले, तर त्याला प्रवेश घ्यावा लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरताना लक्षपूर्वक नोंदणी करावी’, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी केले आहे.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here