मोबाईलचा अति वापर देतोय मृत्यूला आमंत्रण ..

0
331
Google search engine

प्रसारमाध्यम डेस्क

काळाची गरज ठरलेल्या मोबाईल फोनमुळे भारतात आपघातांची संख्या वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाहन चालवताना मोबाईल फोनचा केला जाणार अतिरिक्त वापर.. मोबाईलचा वापर आणि त्यामुळे होणारे अपघात यावर थोडा कटाक्ष टाकू.. 

माणसाच्या हातात मोबईल फोन आला तसा त्याच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झाला. मोबाईलच्या तंत्रज्ञानामुळे संपर्काच्या कक्षा रूंदावल्या गेल्या आणि अवघं विश्वच माणसाच्या कवेत आलं. संपर्क आणि ज्ञानाचा स्त्रोत निर्माण करणारं हे यंत्र माणसाच्या आयुष्याचं अविभाज्य घटक कधी झालं ते समजलंच नाही.. गाव वाड्यातील ते शहरातील जवळपास प्रत्येक माणसाच्या हातात हे यंत्र म्हणजेच मोबाइल फोन रेंगाळत आहे.

गोष्टी ऐकत दूध भात खाणारी पिढी कालबाह्य होऊन मोबाईलवर अंगठा फिरवत हवाबंद डब्यातील आहार खाणारी पिढी याच मोबाईलच्या काळात उदयाला आली.

पण सध्या सोईचा आणि माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असणारा मोबईल त्याच माणसाचा जीव घेत आहे. याच्या अतिरिक्त वापरामुळे सध्या अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. गाडी चालवताना फोनवर अवांतर बोलणे, चॅटिंग करणे, सोशल मिडियचा अतिरिक्त वापर करणे ही काही कारणं आहेतच पण गाडी चालवताना सेल्फी काढणं हे आपघाताचं सर्वात मोठं कारण म्हणून समोर येत आहे. मोबाईलमुळे होणाऱ्या आपघातांची सन २०२३ च्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी दिड लाखांहून अधिक रस्ते अपघात होतात. यापैकी ५% ते १०% म्हणजेच सुमारे ७५०० ते १५००० एवढे अपघात हे मोबाईलच्या वापरामुळे होत असल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत भारतात १ लाख ७२ हजार एवढे मृत्यू मोबाईलमुळे झालेल्या अपघातात झाले आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी ४७४ अपघाती मृत्यू हे मोबाईलमुळे झाले आहेत. ही आकडेवारी पाहता हा प्रश्न गंभीर असल्याचं दिसून येत आहे. गाडी चालवताना मोबाईल फोन वापरल्यास नाममात्र १ हजार ते ५ हजार एवढा दंड आकरला जातो यामुळे कायद्याचा वचक फारसा दिसून येत नाही. यासाठी काही कडक कायद्यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. याचबरोबर सामाजिक प्रबोधनाची सुद्धा गरज आहे.


सुरक्षिततेसाठी उपाय:

1. वाहन चालवताना मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवा.

2. अत्यावश्यक असल्यास हँड्स-फ्री डिव्हाइसचा वापर करा.

3. GPS वापरण्याआधी मार्ग ठरवा.

4. प्रवासात फोन वापरण्यासाठी वाहन थांबवा.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here