Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आठ महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली असून, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले  यांच्या स्मरणार्थ मुंबईत ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

आशा भोसले यांनी आयुष्यात असताना वांद्रे-अंधेरी परिसरात संगीत अकॅडमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळात हा मुद्दा उपस्थित झाला आणि त्यांच्या इच्छेनुसार अकॅडमी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी योग्य जागा शोधण्याचे निर्देश म्हाडाला देण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळातील प्रमुख निर्णय

  1. आशा भोसले संगीत अकॅडमी
    मुंबईत उभारली जाणार; संगीत क्षेत्रातील नव्या पिढीला प्रोत्साहन
  2. शासकीय भरती प्रक्रियेत सुधारणा
    एमपीएससी अंतर्गत सेवांची संख्या ५३ वरून १५३; भरती अधिक सुलभ होणार
  3. महाजॉब्स पोर्टल व ‘निपुण सेतू’ उपक्रम
    युपीएससीच्या धर्तीवर कौशल्याधारित रोजगार सुविधा
  4. कुळगाव-बदलापूर जमीन हस्तांतरण
    वीज उपकेंद्रासाठी टाटा पॉवरला ४ एकर जमीन
  5. IES स्किल टेक विद्यापीठाला मंजुरी
    मुंबईत खाजगी कौशल्य विद्यापीठामुळे रोजगारक्षम मनुष्यबळ वाढणार
  6. मत्स्यव्यवसायासाठी निधी
    नाबार्ड अंतर्गत ६१.२४ कोटींची तरतूद
  7. आरोग्य क्षेत्रासाठी मोठा निधी
    Japan International Cooperation Agency (JICA) कडून ३,७०८ कोटींचे आर्थिक सहाय्य
  8. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा विस्तार
    NITI Aayog अंतर्गत ६ नव्या जिल्ह्यांचा समावेश
  9. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत सुधारणा
    सदस्यांची नियुक्ती निवडणुकीऐवजी नामनिर्देशन पद्धतीने

या निर्णयांमुळे राज्याच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः आशा भोसले यांच्या नावाने उभारली जाणारी संगीत अकॅडमी ही राज्यासाठी सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here