Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

लंडन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहरीनचे राजाहमद बिन ईसा अल खलिफा यांना पत्र पाठवत गल्फ प्रदेशातील सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यासाठी अमेरिकेची बांधिलकी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

बहरीन न्यूज एजन्सीनुसार, ट्रम्प यांनी इराणकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत असताना बहरीनने दाखविलेल्या राष्ट्रीय एकतेचे कौतुकही केले. फेब्रुवारी २८ पासून अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवाईनंतर इराणकडून डागण्यात आलेल्या किमान १८८ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ४७७ ड्रोन बहरीनच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी पाडल्याचा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या नौदलाच्या सेंट्रल कमांड आणि फिफ्थ फ्लीटचे मुख्यालय बहरीनमध्ये असून, इराणने लक्ष्य केलेल्या दहा देशांपैकी बहरीन एक होता. मात्र, बहरीनने अमेरिकेच्या थेट लष्करी कारवाईत सहभाग घेतला नव्हता.

दरम्यान, एप्रिलच्या सुरुवातीपासून इराण आणि अमेरिकेमधील नाजूक शस्त्रसंधी कायम असली तरी जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा असलेला होर्मूझ सामुद्रधुनी मार्ग अद्याप बंद आहे. इराणच्या अणुकार्यक्रमासंदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याचेही वृत्त आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here