स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेला २ कोटी ७९ लाखांचा विक्रमी नफा; १०.२५ टक्के लाभांश जाहीर

0
49
Google search engine

कोल्हापूर :  विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेला यंदा २ कोटी ७९ लाख रुपयांचा उच्चांकी नफा झाला असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे यांनी दिली.पतसंस्थेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन सभागृहात चेअरमन हितेंद्र साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी चेअरमन साळुंखे यांनी सभासदांचे स्वागत करून संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. सचिव संपत वेटाळे यांनी सभेची नोटीस वाचन केले.

पतसंस्थेच्या आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना १०.२५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेची आर्थिक प्रगती, सभासदांचे हित आणि सहकार क्षेत्रातील कामकाज याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

सभेस संचालक राहुल कुंभार, उमेश जाधव, सुनील थोपटे, दत्तात्रय दळवी, संदीप देशमुख, मच्छिंद्र नांगरे, विनोद पन्हाळकर, शशिकांत पाटील, सुहास पाटील, सचिन माने, रवींद्र यादव, राजगोंडा सुतार, शर्मिला साळुंखे, विश्रांत कोळी, अकाउंटंट सुधाकर पाटील आणि लेखापरीक्षक के. एम. देशपांडे उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचालन प्रा. धीरज शिंदे यांनी केले, तर उपाध्यक्ष डॉ. दीपक जाधव यांनी आभार मानले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here