गोकुळ निवडणुकीसाठी महायुती-जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

0
61
Google search engine

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुती-जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने आमदार दलित मित्र अशोकराव माने (बापू) आणि त्यांचे सहकारी संदीप कारंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.सर्व दूध उत्पादक शेतकरी, संस्थाचालक आणि सभासद बांधवांच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती-जनसुराज्य शक्तीच्या समर्थकांची उपस्थिती पाहायला मिळाली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरिडीकर, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह भैया माने, शेतकरी सहकारी संघाचे संचालक अमरसिंह माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, प्रवीण यादव, राजवर्धन मोहिते, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ. नीता माने, डॉ. अरविंद माने, सरपंच सुशांत वड्ड, राजेश पाटील, नानासाहेब राजमाने, स्वीय सहाय्यक सुहास राजमाने, धनंजय टारे, मनोज चौगुले यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, आगामी काळात निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुती-जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने आमदार दलित मित्र अशोकराव माने (बापू) आणि त्यांचे सहकारी संदीप कारंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
सर्व दूध उत्पादक शेतकरी, संस्थाचालक आणि सभासद बांधवांच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती-जनसुराज्य शक्तीच्या समर्थकांची उपस्थिती पाहायला मिळाली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरिडीकर, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह भैया माने, शेतकरी सहकारी संघाचे संचालक अमरसिंह माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, प्रवीण यादव, राजवर्धन मोहिते, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ. नीता माने, डॉ. अरविंद माने, सरपंच सुशांत वड्ड, राजेश पाटील, नानासाहेब राजमाने, स्वीय सहाय्यक सुहास राजमाने, धनंजय टारे, मनोज चौगुले यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, आगामी काळात निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here