गोकुळमधील एकमुखी सत्ता दूध उत्पादकांच्या आर्थिक स्थैर्यासाठी प्रभावी माध्यम : सतेज पाटील

0
57
Google search engine

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील विविध गावांमध्ये आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर यांनी दूध उत्पादक तसेच ठरावधारकांच्या भेटी घेतल्या. सांगरूळ, खाटांगळे, पासार्डे, आमशी, म्हारूळ, बहिरेश्वर, गणेशवाडी, कसबा बीड, महे, कोगे आणि पाडळी या गावांमध्ये त्यांनी दूध उत्पादकांशी संवाद साधला.

गोकुळमध्ये एकहाती सत्ता असल्यामुळे संस्थेच्या हिताचे निर्णय एकमुखी आणि ठोसपणे घेता येतात. तसेच घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होते. ही सत्ता पद, प्रतिष्ठा किंवा दबावासाठी नसून दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रभावी माध्यम असल्याचे सतेज पाटील यांनी ठरावधारकांना सांगितले.

गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय, संस्थेची आर्थिक स्थिरता आणि दूध उत्पादकांना मिळणाऱ्या लाभांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गावांतील ठरावधारक आणि दूध उत्पादकांशी थेट संवाद साधत स्थानिक पातळीवरील प्रश्न जाणून घेण्यात आले.

या दौऱ्यात बाजीराव खाडे, राहुल खाडे, निवास वातकर, संभाजी नाळे, प्रकाश मुगडे, विठ्ठल पाटील, संताजी पाटील, विष्णू पाटील, बाजीराव चौगले, शामराव पाटील, पुंडलिक पाटील, शिवाजी पाटील, रवींद्र मडके, सरदार मोहिते, बंडा काशीद, शिवाजी दिंडे, सूर्यकांत दिंडे, नामदेव लाड, दादा लाड, अर्जुन नलवडे, भगवान सूर्यवंशी, माजी सरपंच उत्तमराव वरुटे, जि. प. सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, शामराव सूर्यवंशी, माजी संचालक सत्यजित पाटील, मनिषा प्रताप पाटील, मारुती वरुटे, पंडित वरुटे, सनी नामदेव गावडे, बुद्धीराज पाटील, बाजीराव जरग, पांडुरंग पाटील, निवृत्ती पाटील, राजश्री जरग, पंडित पाटील, एस. डी. जरग, विश्वास पाटील, रेखा पाटील, भगवान पाटील, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील, बाजीराव पाटील, के. एन. पाटील आदींची भेट झाली.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here