कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार : धनंजय महाडिक

0
12
Google search engine

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि शिक्षण क्षेत्राशी सातत्याने जोडलेले सक्षम नेतृत्व विधानपरिषदेत जाणे आवश्यक असल्याचे महाडिक यांनी नमूद केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनीही कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आमदार म्हणून विधानपरिषदेत पाठविण्याचे आवाहन केले.

यावेळी कौस्तुभ गावडे यांनी जुनी पेन्शन योजना, अशैक्षणिक कामे, TET सक्ती, शिक्षक भरती, अनुदान तसेच महिला शिक्षकांच्या विशेष रजेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देण्याची भूमिका स्पष्ट केली.

कार्यक्रमात आदर्श संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जी. के. थोरात, डॉ. श्रीराम साळुंखे, के. एस. ढोमसे, माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्यासह शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here