कामगारांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही : प्रकाश आबिटकर

0
10
Google search engine

कागल : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकणंगले (मॅक) येथे ईएसआयएसच्या वैद्यकीय सेवांचा आढावा घेण्यात आला. यावेळी दवाखाने व रुग्णालयांतील मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, सेवा-सुविधा आणि रुग्णसंख्येचा आढावा घेऊन आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, रक्तसाठा, अद्ययावत उपकरणे व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामगारांच्या उपचारात हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.

गणेशोत्सवानंतर ईएसआयएस सेवांबाबत संयुक्त बैठक

गणेशोत्सवानंतर केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, ईएसआयएस व कामगार विभाग, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन ईएसआयएस सेवांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत ठोस निर्णय घेतले जाणार आहेत. बैठकीस माजी आमदार जयश्री जाधव, अशोक थोरात, मोहन कुशिरे, सुनील शेळके, जयदीप चौगुले, कमलकांत कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here