राजेंद्रनगरच्या विकासाला मिळणार कोट्यवधींचे बळ; विविध विकासकामांचा शुभारंभ

0
37
Google search engine

कोल्हापूर : राजेंद्रनगर तसेच प्रभाग क्रमांक १७ मधील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या कामांचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार अमल महाडिक, महापौर रुपाराणी निकम यांच्यासह नगरसेवक प्रा. जयंत पाटील आणि शारंगधर देशमुख प्रमुख उपस्थित होते. राजेंद्रनगर परिसराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी दिली.

नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून राजेंद्रनगर येथील रेव्हेन्यू सोसायटीमध्ये गटर बांधकामासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच राजेंद्रनगरमध्ये भूमिगत गॅस वाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्यांवरील चरी बुजविण्यासाठी ६३ लाख रुपये, आर. डी. भोसले नगरमधील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १४ लाख रुपये आणि रेव्हेन्यू सोसायटीतील गटर बांधकामासाठी ७ लाख रुपये, असा एकूण ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय प्रा. जयंत पाटील आणि शारंगधर देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक १७ मधील विविध विकासकामांसाठी २ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रस्ता व गटर बांधकाम, रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच भूमिगत वाहिन्यांसाठी खोदलेल्या चरी हॉटमिक्स डांबरीकरणाने बुजविणे आदी कामांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी राजेंद्रनगर तसेच प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. विकासकामांना गती देऊन परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

आमदार अमल महाडिक यांनीही परिसरातील प्रलंबित विकासकामांना प्राधान्य देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले. महापौर रुपाराणी निकम यांनी महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी प्रियंका कांबळे, विश्वविक्रम कांबळे, परिवहन समिती सदस्य नामदेव नागटिळे, सागर कांबळे, राजू इंदलकर, रोहन शिंदे, समाधान बनसोडे, भारत कोकाटे, अक्षय रजपूत, महादेव घोलप, शिवाजी सकट, मारुती काळे, संपदा काळे, अमोल कांबळे, प्रशांत मोरे, अमित साखरे, प्रसाद पाटोळे, बालाजी रोडगे, दत्ता लोखंडे, अजय कांबळे, गुणवंत नागटिळे, महादेव बिरजे, सुखदेव वाघमारे, संजय लोखंडे, बंकट सूर्यवंशी, महेश चव्हाण, सुखदेव बुध्याळकर, सावळा वाघमारे आणि इम्तियाज गडकरी यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here