गोकुळ शॉपीचे नूतनीकरण; ग्राहक सुविधांना प्राधान्य…

0
29
Google search engine

कोल्हापूर : गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयातील ‘गोकुळ शॉपी’चे नूतनीकरण करण्यात आले. प्रशासकीय मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परुळेकर आणि कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्या उपस्थितीत नूतनीकृत शॉपीचे उद्घाटन झाले.

नूतनीकृत शॉपीमध्ये दूध, दही, ताक, लस्सी, बासुंदी, श्रीखंड, पनीर, तूप, बटर, पेढा, फ्लेवर्ड मिल्क, चीज, आईस्क्रीम यांसह विविध दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे.
“गुणवत्तापूर्ण दूध व उत्पादने हीच गोकुळची ओळख असून ग्राहकांना दर्जेदार उत्पादने सहज उपलब्ध करून देणे आणि चांगल्या सुविधा देणे हे गोकुळचे प्राधान्य आहे,” असे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी सांगितले.
उद्घाटनप्रसंगी गोकुळचे अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक व ग्राहक उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here