कोल्हापूर : वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर यांच्या वतीने नागरिकांसाठी १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत विशेष मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.
या शिबिरामध्ये ऑर्थोपेडिक, नेत्ररोग, त्वचारोग, दंत, जनरल सर्जरी, मेडिसिन, स्त्रीरोग व प्रसूती, कान-नाक-घसा (ENT) आणि फिजिओथेरपी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार डिजिटल एक्स-रे व पॅथॉलॉजी तपासणी सुविधांचाही लाभ घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत हाडांच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे हाडे, सांधे, मणका, फ्रॅक्चर तसेच इतर ऑर्थोपेडिक समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
‘वेळीच तपासणी, योग्य निदान आणि योग्य उपचार’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. विशेषतः दीर्घकाळापासून आरोग्याच्या समस्या असलेले रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिराचा कालावधी : १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट
स्थळ : वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल, १३२५/८५, ओम बालावधूत बिल्डिंग, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर.
संपर्क : ८२६२०३३७७३ / ९५२७४३४३००
मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या!






