मुंबई : आशा गटप्रवर्तकांच्या विविध मागण्या व प्रश्नांबाबत मंगळवारी बाळासाहेब भवन येथे बैठक झाली. पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत गटप्रवर्तकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात गटप्रवर्तकांची महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांच्या प्रश्नांवर ३२०० गटप्रवर्तकांसाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यांच्या योगदानाला योग्य न्याय व सन्मान देण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.






