Google search engine

प्रसारमाध्यम दिग्विजय माळकर

सौदी अरेबिया च्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी इराकी हवाई क्षेत्रातून त्यांच्या सीमेत प्रवेश करणारे तीन ड्रोन

हवेतच पाडल्याची माहिती दिली संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी सांगितले की, देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.

अल-मलिकी यांनी पुढे सांगितले की, सौदी नागरिक आणि परदेशी रहिवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल. एप्रिलमध्ये लागू झालेल्या युद्धविरामानंतर इराणशी संबंधित संघर्षाचे प्रमाण कमी झाले असले, तरी इराकमधून गल्फ देशांकडे ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.कतार ने सौदी अरेबियावरील ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध करताना, सौदीच्या सार्वभौमत्व आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या उपाययोजनांना पूर्ण पाठिंबा दर्शविला. तसेच United Arab Emirates, Bahrain, Kuwait आणि Jordan यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

गल्फ कोऑपरेशन कौन्सिल(Gulf Cooperation Council) चे सरचिटणीस जासेम मोहम्मद अल-बुदाईवी यांनी म्हटले की, सौदी अरेबियाची सुरक्षा ही संपूर्ण गल्फ प्रदेशाच्या सुरक्षेशी निगडित आहे.
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here