Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

मनिला (फिलिपाईन्स):मायॉन ज्वालामुखी (Mayon Volcano) येथून मोठ्या प्रमाणात राख उसळल्यानंतर ३०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळी ज्वालामुखीच्या उतारावर साचलेल्या लाव्हाच्या मोठ्या साठ्याचा अचानक ढासळा होऊन गरम खडक, राख आणि वायूंचा प्रचंड प्रवाह (पाय्रोक्लास्टिक फ्लो) खाली कोसळला.

Philippine Institute of Volcanology and Seismology चे संचालक टेरेसिटो बॅकोलकोल यांनी सांगितले की, स्फोटक उद्रेक झाला नसला तरी राखेचे ढग मोठ्या प्रमाणात पसरले. या घटनेमुळे तीन शहरांतील सुमारे ८७ गावांवर राखेचा मारा झाला.

Camalig येथील महापौर कॅलोय बाल्डो यांनी सांगितले की, “राख इतकी दाट होती की मुख्य रस्त्यावरही काहीच दिसत नव्हते.” खराब दृश्यमानतेमुळे वाहनचालकांना अडचणी आल्या आणि काही ठिकाणी नागरिकांमध्ये घबराट पसरली.

या राखवृष्टीमुळे भाजीपाला शेतीचे मोठे नुकसान झाले असून चार म्हशी आणि एक गाईचा मृत्यू झाला आहे. सध्या प्रभावित भागात स्वच्छता मोहीम सुरू आहे.

२,४६२ मीटर उंचीचा मयोन ज्वालामुखी हा आपल्या परिपूर्ण शंकूाकार रचनेमुळे प्रसिद्ध असला, तरी तो फिलिपाईन्समधील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. जानेवारीपासून येथे सौम्य उद्रेक सुरू असून प्रशासनाने इशारा पातळी ३ वर ठेवली आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी धोका अद्याप कायम आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here