प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांसाठी मोठी डिजिटल सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. EPFO 3.0 या नव्या प्रणालीमुळे आता पीएफ (PF) रक्कम काढणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. विशेष म्हणजे, UPI आणि ATM च्या माध्यमातून PF रक्कम काढण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
काय आहे नवीन अपडेट?
EPFO 3.0 अंतर्गत सदस्यांना थेट UPI ॲप्स—जसे की Paytm, Google Pay (GPay) आणि PhonePe—यांच्या माध्यमातून PF रक्कम काढता येईल. ही रक्कम थेट सदस्यांच्या लिंक्ड बँक खात्यात जमा होईल. सध्या ही सेवा चाचणी टप्प्यात असून, लवकरच ती सर्वांसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
UPI मधून PF कसा काढाल? (प्रोसेस)
आपल्या UPI ॲपमध्ये ‘EPFO Withdrawal’ हा पर्याय निवडा
UAN (Universal Account Number) टाका
काढायची रक्कम नमूद करा
पैसे कशासाठी काढत आहात ते कारण निवडा (उदा. वैद्यकीय, घर, लग्न)
नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाका
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल
कोणत्या कारणांसाठी PF काढता येतो?
वैद्यकीय उपचार
घर खरेदी किंवा बांधकाम
विवाह खर्च शिक्षण किंवा इतर आपत्कालीन गरजा पेपरवर्कला पूर्णविराम
या नव्या प्रणालीमुळे PF काढण्यासाठी कोणतेही कागदपत्र सादर करण्याची गरज उरणार नाही. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि जलद होणार आहे.
महत्वाची सूचना
सध्या UPI द्वारे PF काढण्याची सुविधा सुरू झालेली नाही. त्यामुळे सदस्यांनी अधिकृत घोषणा येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.






