Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

राण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक थरारक आणि चमत्कारिक घटना समोर आली आहे. इराणकडून अमेरिकेचे अत्याधुनिक F-15E Strike Eagle फायटर जेट पाडण्यात आले, मात्र या घटनेनंतरही दोन्ही क्रू मेंबर्सचा जीव वाचवण्यात अमेरिकेला यश आले आहे. या विमानात एक पायलट आणि एक वेपन्स सिस्टम ऑफिसर (WSO) होते. हल्ल्यानंतर दोघांनी पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी लँड झाले. WSO जखमी अवस्थेत डोंगराळ भागात लपून बसला होता, तर इराणी सैन्य त्याचा आणि पायलटचा शोध घेत होते.

दरम्यान, इराणने या दोघांना जिवंत पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले होते. परिस्थिती अत्यंत धोकादायक असतानाच एक आश्चर्यकारक वळण आले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान कोसळल्यानंतर अमेरिकेला God is good असा तीन शब्दांचा संदेश प्राप्त झाला. सुरुवातीला हा शत्रूचा सापळा असू शकतो, अशी शंका होती. मात्र नंतर हा संदेश जखमी अधिकाऱ्याने पाठवल्याचे स्पष्ट झाले.

या संदेशाच्या आधारे अमेरिकेने त्याचे लोकेशन ट्रॅक केले आणि विशेष बचाव मोहीम राबवली. दिवसा पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यात आले, तर रात्रीच्या ऑपरेशनमध्ये जखमी WSO चा शोध घेऊन त्यालाही वाचवण्यात आले.

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here