मराठी चित्रपटांसाठी मुंबईत लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह

0
40

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

मुंबईत मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून राज्यातील इतर भागांतही टप्प्याटप्प्याने मराठी चित्रपटगृहांचे जतन आणि विकास केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसाहाय्य योजनेच्या धनादेश वितरण सोहळ्यात ते बोलत होते, या कार्यक्रमात ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण झालेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट तसेच कोविड काळातील ९८ चित्रपटांना एकूण २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले

या प्रसंगी सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर तसेच विविध चित्रपट निर्माते उपस्थित होते

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘श्यामची आई’ या चित्रपटाला ७९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला, तसेच दिग्दर्शक अपर्णा हौसिंग, शीतल शेट्टी आणि स्नेहल तरडे यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा प्रोत्साहन निधी देऊन गौरविण्यात आले

दर्जेदार मराठी सिनेमा निर्मितीस चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अशा योजनांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here