Now the new and fun ‘Nano Banana’ figurines have taken social media by storm.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
इंटरनेटवर कोणता ट्रेंड अचानक व्हायरल होईल हे सांगणे कठीण असते. काही दिवसांपूर्वी घिबली स्टाईलचे फोटो ट्रेंड झाले होते, तर आता नवीन आणि मजेशीर ‘ Nano Banana ’ फिगरिन्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लहान, चमकदार आणि कार्टून सारख्या दिसणाऱ्या या 3D डिजिटल फिगरिन्सने वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. Google च्या Gemini 2.5 Flash Image या एआय टूलच्या मदतीने तयार होणारे हे फोटो अतिशय आकर्षक आणि सहज बनवण्यासारखे असल्यामुळे झपाट्याने लोकप्रिय झाले.
ट्रेंड का झाला व्हायरल
‘Nano Banana’ ट्रेंड इतक्या वेगाने व्हायरल होण्यामागे अनेक कारणे आहेत :
फोटो तयार करणे अतिशय सोपे आहे
स्टुडिओ-स्तरीय गुणवत्ता मिळते
Google चे AI टूल कोणत्याही यूझरसाठी फ्री उपलब्ध आहे
काही सेकंदांत 3D फिगरिन्स तयार होतात
पाळीव प्राणी, सेलिब्रिटी, राजकीय व्यक्ती किंवा स्वतःचे रूप यांसारखे मजेशीर पर्याय वापरता येतात
यामुळे लोकांनी आपल्या आवडत्या व्यक्तींचे Nano Banana फिगरिन्स तयार करून सोशल मीडियावर शेअर करणे सुरू केले आहे.
अशा प्रकारे Nano Banana 3D Model तयार करा
तुम्हालाही हा ट्रेंड वापरून स्वतःचा Nano Banana तयार करायचा असेल तर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा :
गुगल एआय स्टुडिओ किंवा Gemini अॅप/वेबसाइटवर जा.
Method निवडा – फोटो, टेक्स्ट प्रॉम्प्ट किंवा दोन्ही एकत्र वापरा.
प्रॉम्प्ट एंटर करा:
Create a 1/7 scale commercialized figurine of the characters in the picture, in a realistic style, in a real environment. The figurine is placed on a computer desk. The figurine has a round transparent acrylic base, withnotexton the base. The content on the computer screen is a 3D modeling process of this figurine. Next to the computer screen is a toy packaging box, designed in a style reminiscent of high-quality collectible figures, printed with original artwork. The packaging features two-dimensional flat illustrations.
Generate वर क्लिक करा.
काही वेळात तुमचा Nano Banana तयार होईल ! इच्छित परिणाम न मिळाल्यास प्रॉम्प्टमध्ये आवश्यक बदल करा.
ही एआयच्या मदतीने सर्जनशीलतेला मिळालेली नवी दिशा आहे. इंटरनेट वरील हलकीफुलकी मजा आणि तांत्रिक प्रगती यांचा एकत्रित आनंद घेण्याचा हा एक वेगळा अनुभव ठरतो आहे. ‘Nano Banana’ ट्रेंडने एआय टूल्स किती सहज आणि सर्जनशील असू शकतात याचा नवा पायंडा घातला आहे.