जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

जिल्ह्यात एकूण सरासरी ६५.५ मिमी पाऊस; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १५१.३ मिमी पावसाची नोंद

0
115
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर असून कोल्हापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे तुडुंब भरुन वाहत आहेत. नैसर्गिक आपत्ती विषयी जिल्हा प्रशासनाकडून दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करण्यात येत असून १९ ऑगस्टच्या सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १५१.३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात हातकणंगले- ५०.८ मिमी, शिरोळ -३४.४ मिमी, पन्हाळा- ७०.९ मिमी, शाहुवाडी- ७७ मिमी, राधानगरी- ९१.८ मिमी, गगनबावडा- १५१.३ मिमी, करवीर- ५९.९ मिमी, कागल- ७२ मिमी, गडहिंग्लज- ५१.९ मिमी, भुदरगड- ९२.२ मिमी, आजरा- ६६.९ मिमी, चंदगड- ६५.४ मिमी असा एकूण ६५.५ मिमी पाऊस २४ तासात पडल्याची नोंद आहे.

वाहतूक स्थिती:

रस्ते वाहतुकीबाबत अहवालानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सुरु आहेत. राज्यमार्ग: ४ बंद झाले आहेत. प्रमुख जिल्हा मार्ग: १२ बंद, इतर जिल्हा मार्ग १ आणि ग्रामीण मार्ग: १० असे एकूण ११ रस्ते बंधाऱ्यावर, रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद आहेत. बंद असलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरु आहे.

पावसामुळे झालेले नुकसान : 

पूर्णत: पडलेली घरे– पक्की घरे व कच्ची घरे- १, ४. अंशत: पडलेली घरे-४
कच्ची घरे- ६६

बाधित गोठ्यांची संख्या – १  एकूण – ३९

जिवीत हानी/ मृत व्यक्ती- १८ ऑगस्ट पर्यंतची संख्या-३
मृत दुधाळ जनावरे-
मोठी जनावरे- १८ ऑगस्ट रोजीची संख्या – १, १८ ऑगस्ट पर्यंतची संख्या- ७
सार्वजनिक/ खासगी मालमत्तांचे नुकसान-
१८ ऑगस्ट पर्यंतची संख्या-५
खासगी मालमत्ता-१८ ऑगस्ट रोजीची संख्या – ६८, १८ ऑगस्ट पर्यंतची संख्या- ६६१

 जिल्ह्यामधील नदी पातळी, धरण, वाहतूक व नुकसानाची सद्यस्थिती : 

पंचगंगा नदीची पातळी (सकाळी 10 वाजेपर्यंत) खालीलप्रमाणे आहे:
राजाराम बंधारा: सद्याची पातळी ३५.११ फूट (इशारा पातळी ३९ फूट, धोका पातळी ४३ फूट).
शिरोळ बंधारा: सद्याची पातळी ४३ फूट (इशारा पातळी ७४ फूट, धोका पातळी ७८ फूट).
नृसिंहवाडी: सद्याची पातळी ४०.६ फूट (इशारा पातळी ६५ फूट, धोका पातळी ६८ फूट).
सुर्वे : सद्याची पातळी ३२.८ फूट (इशारा पातळी ४८ फूट, धोका पातळी ५० फूट).
रुई : सद्याची पातळी ६१.८ फूट (इशारा पातळी ६७ फूट, धोका पातळी ७० फूट).
इचलकरंजी : सद्याची पातळी ५७.२ फूट (इशारा पातळी६८ फूट, धोका पातळी ७१ फूट).
तेरवाड: सद्याची पातळी ५१ फूट (इशारा पातळी ७१ फूट, धोका पातळी ७३ फूट).

धरण स्थिती: जिल्ह्यातील प्रमुख धरणांची स्थिती (१९ ऑगस्ट) :

राधानगरी धरण: एकूण क्षमता ८.३६ टीएमसी, आजचा साठा ८.३६ टीएमसी, टक्केवारी १००, विसर्ग ११५००
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक १,२,३,४,५,६,७ (सर्व दरवाजे) खुले आहेत.
तुळशी धरण: एकूण क्षमता ३.४७ टीएमसी, आजचा साठा ३.४२ टीएमसी, टक्केवारी ९९, विसर्ग १५००
वारणा धरण: एकूण क्षमता ३४.३९ टीएमसी, आजचा साठा ३२.१२ टीएमसी, टक्केवारी ९३, विसर्ग १८६३०
दूधगंगा धरण: एकूण क्षमता २५.३९ टीएमसी, आजचा साठा २३.४९ टीएमसी, टक्केवारी९३, विसर्ग ७६००
नैसर्गिक दैनंदिन आपत्ती अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिला आहे.
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here