डॉक्टर, सर्जन, वैद्य या क्षेत्रासाठी कुंडली शास्त्र काय सांगते…

0
230
Google search engine

डॉक्टर, सर्जन, वैद्य या क्षेत्राचा विचार केला तर सर्वप्रथम कुंडली मधील बारास्थानांपैकी षष्ठस्थानाचा विचार केला जातो, कारण या स्थानाला कुंडली शास्त्राप्रमाणे रोगस्थान मानले जाते व त्याच बरोबर अष्टमस्थान म्हणजे मृत्यूस्थान म्हणून या स्थानाचा विचार केला जातो, म्हणजे मृत्यूस्थानाचाही विचार केला जातो. रोगस्थान व मृत्यूस्थान या स्थानाबरोबर सहाव्या स्थानासमोरील स्थान म्हणजे बारावे स्थान ज्याला व्ययस्थान मानले जाते, हे  स्थान हॉस्पिटल संबंधित असल्यामुळे त्यामुळे ह्या स्थानाचाही विचार केला जातो गंमत अशी आहे. 

सर्वसामान्यपणे ६, ८, १२ ह्या स्थानांना कुंडली शास्त्राप्रमाणे बारास्थानामध्ये पापस्थाने मानली जातात. पण डॉक्टर, सर्जन, वैद्य या क्षेत्रासाठी हीच स्थाने महत्वाची ठरतात. द्वितीयस्थान हे धनस्थान आहे. परंतु, हे सहाव्या म्हणजे रोगस्थानाचे भाग्यस्थान आहे आणि पराक्रम म्हणजे तृतीयस्थान हे रोगस्थानाचे दशमस्थान आहे. त्यामुळे ६, ८, १२ या बरोबर २, ३, ९, १०, ११ ही देखील स्थाने महत्वाची आहेत.

कुंडलीतील स्थानांबरोबर जर आपण राशींचा विचार केला तर या क्षेत्राच्या कुंडल्या पहिल्या असता. कन्या, वृश्चिक, धनु, मेष, मिथुन, तुला ही लग्नराशी प्रामुख्याने दिसतात व ह्या चंद्र राशीही कुंडलीत आढळून येतात. नैसर्गिक कुंडली प्रमाणे सहाव्या स्थानामध्ये कन्या व आठव्या स्थानामध्ये वृश्चिक राशी येते. कन्या राशी स्वभावतः बुद्धिवादी व चिकित्सक राशी आहे, म्हणून महत्वाची व वृश्चिक राशी औषधे व रसायन शास्त्राशी निगडीत आहे म्हणून महत्वाची असे मानले जाते.

तसे पहिले तर कन्या राशीचा स्वामी बुध आहे व बुध या ग्रहास नवग्रहामध्ये बुद्धीचा कारक ग्रह मानले आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ व मंगळ ग्रह डॉक्टर, सर्जन, वैद्य या क्षेत्रासाठी जास्त महत्वाचा आहे. नैसर्गिक कुंडलीप्रमाणे मंगळ हा ग्रह लग्नेश व अष्टमेश आहे व निष्ठात सर्जनच्या कुंडली मध्ये प्रामुख्याने मंगळ कर्क, वृश्चिक व मीन या जलराशीत किंवा मेष, सिंह, धनु या राशीत दिसून येतो. त्याच बरोबर आपण १२ व्या स्थानाचा विचार केला असता, नैसर्गिक कुंडलीप्रमाणे मीन या जलराशीचे आहे व या राशीचास्वामी गुरु आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक ग्रह आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गुरु हा आत्मीक शक्तीसाठी चांगली फले देतो. जर गुरु चांगला असेल तर डॉक्टर स्वतःबरोबर पेशंटचीही आत्मिकशक्ती वाढवू शकतो व ते स्वतः आनंदी राहतात व पेशंटनाही आनंदाने उत्साहाने उत्तम सेवा देतात. त्यामुळे पेशंटच्या मनात त्यांच्या विषयी प्रेम निर्माण होते. तसे पहिले तर कुंडलीमध्ये गुरु बलवान असल्याखेरीज या क्षेत्रामध्ये प्रगती साधता येत नाही.

डॉक्टर, सर्जन यांना लोकप्रियता देणारा ग्रह आहे. त्यामुळे मंगळाबरोबर गुरु ग्रहालाही खूपच महत्व आहे. त्यामुळे गुरु कुंडली मध्ये स्वराशीत उच्चराशीत, मित्रग्रही किंवा शुभसंबंधित असावा. जर पत्रिकेमध्ये मंगळ गुरुचे शुभयोग बनत असतील तर या क्षेत्रामध्ये प्रगती खूप चांगल्या प्रकारे होते. डॉक्टर होण्यासाठी गुरु मंगळाचा एकतरी शुभ योग असावा लागतो. दुसऱ्याचे दुःख निवारण करण्यासाठी. सर्व डॉक्टर, सर्जन, वैद्य यांच्या षष्ठस्थान षष्ठेश द्वादशेश यावर प्रत्येकी एकतरी शुभयोग असला पाहिजे नाहीतर रुग्णांचा त्रास संभवतो.

  • बुध बुद्धीचा, गुरु ज्ञानाचा व मंगळ धाडसाचा कारक ग्रह आहे. बुद्धिवादी ज्ञानी असून सुद्धा एक उत्तम सर्जन होण्यासाठी धाडसही लागते, त्यामुळे या तीन ग्रहांचे जर कुंडली मध्ये चांगल्या प्रकारे उत्तमयोग बनतील तर अशी व्यक्ती उत्तम सर्जन बनू शकते.
  • उत्तम सर्जन बनण्यासाठी पत्रिकेमध्ये मंगळ १, ३, ६, ९, १०, ११ या स्थानांमध्ये स्वराशीमध्ये किंवा उच्चराशीमध्ये असणे गरजेचे आहे, अगदी तसेच अग्नी व पृथ्वीराशित विशेष अनुकूल समजावा असे डॉक्टर उत्तम शस्त्रक्रिया करू शकतात. त्यानंतर वायु राशी साधारण, वायु राशित मंगळ असणारे डॉक्टर सर्जन नसतात, ते रोग चिकित्सक असू शकतात.
  •  मिथुन, कर्क, तुला व वृश्चिक या जल व वायू राशी मध्ये पुनर्वसू व विशाखा ही गुरूची नक्षत्रे येतात. कर्क व वृश्चिक या जलराशी मध्ये ज्येष्ठा व आश्लेषा ही बुधाची नक्षत्रे येतात. मकर, कन्या, मिथुन तुला या पृथ्वी व वायूराशी मध्ये धनिष्ठा, चित्रा, मृगशीर ही मंगळाची नक्षत्रे येतात व ती जास्त महत्वाची आहेत.
  • बुध हा बुद्धी व हस्तकौशल्य देतो, त्याच बरोबर तो तर्कबुद्धी देतो, त्यामुळे डेंटिस्टना हा ग्रह फार महत्वाचा आहे. बुध अग्निराशीत असू नये व त्याच्यावरती शनी मंगळ या पापग्रहांची अशुभ दृष्टीयोग असू नयेत. जर कुंडलीत षष्ठेश म्हणजे सहाव्या स्थानी जी राशी आहे. त्या राशीचा स्वामी ग्रह बलवान असेल तर तो ६, ८, १२ या स्थानाव्यतिरिक्त इतर स्थानात असावा. सर्वात महत्वाचे म्हणजे डेंटिस्टच्या कुंडलीत शनी-बुध अनुकूल शुभस्थितीत असावेत.
  • राहू केतू या क्षेत्रासाठी पूरक ठरतात. पण ते कुंडलीमध्ये बलवान असले पाहिजेत. ते जर बलवान असतील तर असे डॉक्टर अयोग्य औषधाचा वापर करतात. अन्यथा चुकीचा करू शकतात.
  • शुक्र हा ग्रह स्त्री ग्रह आहे आणि हा ग्रह रोग चिकित्सक बनवू शकतो.
  •  मसाज रोग निवारक पद्धतीने म्हणजे, थेरपिक पद्धतीने आजार बरे करणाऱ्या डॉक्टर वैद्य यांच्या कुंडलीत नेपच्यून शुभ संबंधित असतो.
  • अल्ट्रा व्हायलेट, हाय फ्रिक्वेन्सी करणे किंवा इतर प्रकारची किरणे अगर विजेचे इतर उपाय करून आजार बरे करणाऱ्या डॉक्टरांच्या कुंडलीत हर्षल ग्रहावर मंगळ शनी नेपच्यून यांचे शुभयोग असणे आवश्यक आहे. नेपच्यून १, ३, ६, ९, ११ या पैकी स्थानी असेलतर डॉक्टर निश्चितपणे यशस्वी होतात.
  • कन्या राशी स्वभावतः बुद्धिवादी व चिकित्सक राशी, वृश्चिक राशीचा स्वामी बुध. बुध हा ग्रह नवग्रहामध्ये बुद्धीचा कारक ग्रह आहे व तो मिथुन व कन्या या राशींच्या म्हणजे वायू व पृथ्वीतत्वाच्या राशींचा स्वामी आहे व वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ, व मंगळ ग्रह डॉक्टर सर्जन वैद्य या क्षेत्रासाठी जास्त महत्वाचा ग्रह आहे.
  •  १२ वे स्थान नैसर्गिक कुंडलीप्रमाणे मीन या जल राशीचे आहे व या राशीचा स्वामी गुरु, गुरु हा ज्ञानाचा कारक ग्रह आहे. म्हणजे पत्रिकेमध्ये गुरु बलवान असल्या खेरीज या क्षेत्रामध्ये प्रगती साधता येत नाही.
  • तुमच्या कुंडली मध्ये मंगळ गुरुचे शुभयोग होत असतील तर या क्षेत्रामध्ये प्रगती खूप चांगल्या प्रकारे होते. गुरु ज्ञानाचा, बुध बुद्धीचा, मंगळ धाडसाचा. बुद्धिवादी, ज्ञानी असून सुद्धा एक उत्तम सर्जन होण्यासाठी धाडसही लागते. त्यामुळे या तीन ग्रहांचा जर कुंडलीमध्ये चांगल्या प्रकारे उत्तम योग बनतील तर अशी व्यक्ती उत्तम सर्जन बनू शकते.
  • उत्तम सर्जन बनण्यासाठी मंगळ पत्रिकेमध्ये १, ३, ६, ९, १०, ११ या स्थानामध्ये स्वराशीमध्ये किंवा उच्चराशीमध्ये असणे गरजेचे आहे.

 – ज्योतिषविशारद मानसी पंडित, संवाद – ९३७१२३३५५३

————————————————-—————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here