‘पिंक ई-रिक्षा’ महिला सक्षमीकरणास उपयुक्त

महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे

0
186
Google search engine
कोल्‍हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

महिलांची उन्नती साधत त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पिंक ई – रिक्षा योजनेच्या धर्तीवर  महिला व बालविकास विभागाच्या योजना अधिक आधुनिक व नाविन्यपूर्ण पद्धतीने राबवणे आवश्यक आहे. याच दृष्टीने महिलांच्या विकासाबरोबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील तीन टक्के निधीतून महिलांच्या नाविन्यपूर्ण उद्योग निर्मितीला चालना देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा व रुपे कार्डचे वितरण करण्यात आले, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आबिटकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तर खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार राजेश पाटील, महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कायनेटिक कंपनीचे विक्री विभागाचे उपाध्यक्ष जोयेल जॉर्ज, फायनान्स विभागाचे उपाध्यक्ष अग्रदीप रॉय आदी प्रमुख उपस्थित होते.
महिला व बाल विकास विभागाच्‍या नेतृत्‍वांतर्गत या उपक्रमाची पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, कोल्‍हापूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर या ८ जिल्‍ह्यांमध्‍ये १०,००० पर्यावरणपूरक कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक तीनचाकी रिक्षा तैनात करण्‍याची योजना आहे. या योजनेअंतर्गत, महाराष्‍ट्र सरकार प्रत्येक ई-रिक्षाच्या किमतीवर २० टक्‍के अनुदान देईल, तर लाभार्थी १० टक्‍के रक्‍कम डाउन पेमेंट म्हणून देतील.
उर्वरित ७० टक्‍के रक्‍कम प्रमुख वित्तीय भागीदारांनी दिलेल्या बँक कर्जाद्वारे दिली जाईल, ज्यामधून सुलभ आणि कमी व्याजदरामध्‍ये आर्थिक साह्याची खात्री मिळेल. याव्यतिरिक्‍त, महाराष्‍ट्र सरकार व कायनेटिक ग्रीन लाभार्थ्यांशी संलग्‍न होण्‍यासाठी आणि बचत गटासोबत सहयोग करण्यासाठी विविध ठिकाणी प्रत्यक्ष उपक्रम राबवतील. त्यांना अधिक पाठिंबा देण्यासाठी कायनेटिक ग्रीन मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण देईल, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यास मदत करेल आणि उत्तम चार्जिंग पायाभूत सुविधा उभारेल.
कायनेटिक ग्रीन आठ सहभागी जिल्ह्यांमध्ये १५०० चार्जर तैनात करणार आहे, जेणेकरून योजनेच्या प्राप्‍तकर्त्यांना सर्वांगीण सुविधा उपलब्‍ध होतील. तसेच, वेईकल आणि बॅटरी दोन्ही पाच वर्षांच्या वॉरंटीसह येतील, सर्व नियतकालिक आणि प्रतिबंधात्मक देखभाल सेवांचा समावेश असलेला व्यापक वार्षिक देखभाल करार (एएमसी) असेल, ज्यामध्ये पाच वर्षांसाठी प्रत्येक तिमाहीत एक मोफत सेवा समाविष्‍ट असेल. कायनेटिक ग्रीन महाराष्‍ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि विविध राइड-हेलिंग सेवा प्लॅटफॉर्मसोबत सक्रियपणे धोरणात्मक सहयोग करत आहे. हे सहकार्य प्रवाशांना पहिल्या आणि शेवटच्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीचे महत्त्वाचे पर्याय देण्यासाठी करण्‍यात आले आहे.
ही योजना २० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे, ज्यामध्ये विधवा, घटस्फोटित आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना प्राधान्य दिले जाते. कायनेटिक ग्रीन पिंक ई-रिक्षा प्रति चार्ज १२० किमी रेंज देते. या वेईकलमध्‍ये उच्‍च दर्जाच्‍या आरामदायीपणासाठी ड्युअल सस्पेंशन, डिजिटल डिस्प्ले पॅनल, ड्युअल हेडलॅम्प आणि २२० मिमी उच्‍च ग्राउंड क्लीयरन्स आहे. ड्रायव्हर आणि चार प्रवाशांसाठी डिझाइन केलेली ही वेईकल मानक १६-अॅम्पियर होम सॉकेट वापरून सोयीस्करपणे चार्ज करता येऊ शकते.
कायनेटिक ग्रीन लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एजन्सी नियुक्‍त करणार आहे, ज्‍यामुळे सर्व चालक त्यांच्या ई-रिक्षा कार्यक्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक कौशल्यांसह सुसज्ज असतील. महाराष्‍ट्राने लिंग समानता आणि हरित गतिशीलतेकडे धाडसी पाऊल उचलले असताना कायनेटिक ग्रीन अधिक न्याय्य आणि शाश्वत भविष्याच्‍या दिशेने मार्ग सुकर करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.
———————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here